मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगती कशी साधता येईल, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी राजभवन येथे वित्त व नियोजन, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास या विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा उपस्थित होते.
महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. या समस्या आपल्या सर्वांना मिळून सोडवायच्या आहेत असे सांगून राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात आल्यानंतर मी अनेक लोकांशी संवाद साधला. या संवादामध्ये मला शिक्षण, ग्रामीण आणि आदिवासींचा विकास, कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती हे विषय प्राधान्याने हाताळणे आवश्यक असल्याचे वाटले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षण सेवा आणि या क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

0 comments :
Post a Comment