Home » , , , » येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात अामूलाग्र बदल करणार- विनोद तावडे

येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात अामूलाग्र बदल करणार- विनोद तावडे

Written By . on Wednesday, 26 November 2014 | 02:42

मुंबई : येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रात अामूलाग्र बदल करण्याचा निर्धार शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

राज्यातील 14 अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची बैठक शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या समिती कक्षात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील, असे श्री.तावडे यांनी सांगितले. अस्थायी आणि दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, अनुकंपा तत्वाच्या संदर्भात शासकीय स्तरावर नियम बदलणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात सवलत मिळण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाल्यास त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळावा, सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेची रक्कम मिळणे इत्यादींसह विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
SHARE

About .

0 comments :

Post a Comment