मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्यासोबतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधीमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय संसदीय अभ्यासवर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे आदींसह विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यात स्वच्छता अभियानाला महत्त्व देऊन गलिच्छ वस्त्यांमध्ये ते प्रभावीपणे राबविले पाहिजे, असेही श्री. बागडे यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, नवनिर्वाचित आमदारांनी संदर्भासाठी राज्यघटनेची एक प्रत सोबत ठेवली पाहिजे. तसेच एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी विधीमंडळाच्या ग्रंथालयाचा सातत्याने वापर करावा. आपल्या भाषणात त्यांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरजही प्रतिपादित केली.
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने विधीमंडळ सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करुन एक चांगली परंपरा निर्माण केली असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी आभार मानले.

0 comments :
Post a Comment